Upasana Lamps
Upasana Lamps
English
मराठी
English
- Since ancient times, people have used different lamps during worship and prayers.
- These lamps are made of brass, metal alloys, and silver.
- ‘Upasana’ lamps create a serene atmosphere and help concentration.
- There are many types of lamps. These include Samais placed at specific locations, Panati, Niranjan, stone lamps, lamps with base, hanging Samai, lamps that accommodate more oil, Pancharati, Saptarati, Laman Dive, etc.
- These lamps have images of animals, birds, and deities in the designs.
मराठी
पूर्वीपासून ईश्वराच्या उपासनेत दिव्यांचे विशेष स्थान आहे. काळानुसार व उपयोगानुसार विविध प्रकारचे दिवे अस्तित्वात आले. पितळ, पंचधातू, चांदी यांचा वापर करून दिव्याची रचना केली आहे. यात तेल घालून वात लावली की प्रकाश पसरतो व वातावरण प्रसन्न होते. या दिव्याचे अनेक प्रकार आहेत. विशिष्ट जागी ठेवण्याच्या समया, पणत्या, निरांजने, दगडी दिवे व बैठक असणारे दिवे असतात. तसेच टांगायच्या दिव्यांमध्ये समया व अधिक तेल सामावणारे दिवे यांचा समावेश होतो. पंचारती, सप्तआरती, लामणदिवे हे सर्व ओवाळण्याचे दिवे आहेत. दिव्यांची घडाई करताना प्राणी, पक्षी, देवता यांच्या प्रतिमांचा डिझाईनमध्ये समावेश केलेला दिसतो.