Lanterns
Lanterns
English
मराठी
English
- Lanterns are being used, even today.
- Lantern-designs have many variations. Different types of glasses are used in the lanterns.
- Kerosene is commonly used as a fuel. The lantern has a handle for convenient holding.
- Lanterns have multiple applications. We can carry them in hand, place them on a table, ground, or carry on a tour. Similarly, we can hang it on a wall.
- Due to the glass cover, it emits bright and steady light even in stormy situations. This makes it a close friend of the farmers.
- Lanterns are commonly used even today, in rural areas, where the power supply is often disrupted.
मराठी
कंदील हा अगदी आजपर्यंत वापरला जाणारा दिवा आहे. कंदिलाच्या डिझाईनमध्ये पुष्कळ विविधता आढळते. काचाही वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. सामान्यपणे कंदिलात रॉकेल इंधन म्हणून वापरले जाते. कंदील पकडण्यासाठी सोयीस्कर असे हँडल असते. कंदील हा एक बहुगुणी, बहुउपयोगी दिवा आहे. तो हातात घेऊन फिरता येते. कंदील प्रवासाला नेता येतो, टेबलावर किंवा जमिनीवर ठेवता येतो, त्याचप्रमाणे भिंतीवर एखादया खुंटीला टांगता येतो. वादळवाऱ्यातही तो विझत नाही म्हणून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा तो महत्वाचा साथीदार आहे. ज्या भागात वीजपुरवठा वरचेवर खंडित होतो अशा वस्त्या-वाड्यांवर कंदील आजही अत्यंत उपयुक्त ठरतो.