Hanging lamp/ टांगता दिवा
English
मराठी
English
- It is a chain type hanging lamp pair.
- The age is around 500 years.
- In the olden days, the assembly hall of temples witnessed various cultural programs and such chain type hanging lamps were used there.
Specialties:
- The lamp has a peacock at the bottom. Below this peacock is a sharply pointed part similar to a wick holder (Panati) with oil and a wick. Also, the chain is decorated with small peacocks all along. It is a beautifully carved lamp.
- A chain connects the lower part of the Panati with the peacock.
- To light the lamp, turn it upside down. Then set aside the Panati, remove the chain, and fill oil in the lamp.
- Re-attach the Panati and lock it with the chain. The oil drips from the peacock. So, the light glows continuously for hours.
- This beautiful lamp enhances the charm of the programs conducted in the temples or any cultural programs.
मराठी
- हा साखळी पद्धतीचा टांगता दिवा आहे.
- याचे अंदाजे वय ५०० वर्ष असावे.
- पूर्वीच्या काळी देवालयाच्या गर्भागारापुढे असणाऱ्या सभामंडपात अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होत. अशा कार्यक्रमांसाठी प्रकाशकमळ असलेले दिवे वापरले जात. अशा प्रकाशकमळांमध्ये अनेक वाती लावण्याची सोयही आसे.
वैशिष्ट्य
- या दिव्यामध्ये दिसणाऱ्या मोराच्या तळाशी पणतीसारखा टोकदार असा एक भाग आहे. ज्याच्यामध्ये तेल आणि वात लावण्यासाठी जागा आहे. त्याचबरोबर वरच्या अत्यंत सुबक आणि सुंदर अशा साखळीवर छोटे छोटे मोर आपल्याला दिसतात. अतिशय सौंदर्यपूर्ण असा कोरीव पध्दतीचा हा दिवा आहे.
- यात दिवा लावण्याची एक अनोखी पध्दत आहे. यात खालच्या पणतीचा भाग एका साखळीने जोडलेला आहे. तो दिवा उलटा करून ती साखळी काढून पणती बाजूला करून तेल भरायचे आणि पुन्हा साखळीला पणती लावायची. म्हणजे दिव्याच्या खालच्या भागात तेलाने भरलेल्या मोरातले थेंब थेंब तेल पडते आणि दिवा पुष्कळ तास जळत राहतो.
- तासनतास चालणाऱ्या मंदिरातल्या कार्यक्रमांची शोभा वाढवणारी अशी देखणी रचना या दिव्याची आहे.