Railway lamps / रेल्वेचा दिवा
English
मराठी
English
- It is a small, box-type railway lamp. It has a significant and round front cover with red-colored glass.
- It is about 150 years old.
- The front cover opens in such a way that half of the lamp is accessible from inside.
- Fill the smaller kerosene box to light the wick. This lamp gives a bright light.
- The lamp has a square cap.
- One can hang this lamp easily and initiate the work.
- It is installed where the red light is required.
- Due to the big front cover, the lamp emits red color.
मराठी
- हा रेल्वेचा दिवा छोट्याशा आकाराचा डब्या सारखा आहे. दिव्याच्या पुढच्या बाजूला मोठा गोल भाग असून त्याला आत मध्ये तांबड्या रंगाची गोल काच बसवलेली आहे. झाकण डब्याच्या निम्म्या आकारा इतके उघडता येते. आत मध्ये रॉकेलचा डबा असतो. तो बसवून झाकण लावलं की या दिव्याचा लाल भडक असा उजेड पडतो. दिव्याला डोक्यावरती चौकोनी आकाराची एक टोपी आहे. शिवाय दिवा अडकवायची सोय आहे. एकदा हा दिवा अडकवला की तिथले काम सुरु होते. तो पुन्हा तेथून हलवायचा नाही. अशा पध्दतीचा हा दिवा आहे.
- याचा लाल उजेड पडतो. ज्या ठिकाणी लाल दिवा दाखवणे आवश्यक आहे त्याठिकाणी तो बसवलेला असतो. त्याचे तोंड खूप मोठे आहे आणि त्यातून येणाऱ्या प्रकाशाला त्या रंगाचा झोत प्राप्त होतो.
- साधारणपणे १५० वर्षांपूर्वीचा हा दिवा आहे.