These lamps have a solid iron base to improve stability.
The base has an elongated pipe 3” to 4” high to hold the candle.
A common man’s house will have these kinds of candles.
मराठी
हे दोन्ही एकाच प्रकारचे दिसायला साधे असे दिवे आहेत. दोन्ही दिव्यांना जड बिडाची आणि लोखंडाची बैठक आहे. तीमध्ये तीन ते चार इंच उंचीची निमुळती अशी वर थोडी मोठी होत जाणारी नळी आहे. तिच्या मध्ये मेणबत्ती ठेवता येईल अशी जड बुडाची जागा आहे. हे दिवे त्यामानाने अलीकडचे आहेत. सामान्य माणसाच्या घरातील कॅन्डल स्टिक असे आपण म्हणू शकतो.